आपुलकी सभासद निधी योजना

संस्थेच्या सदर योजनेस 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता मिळाल्यानंतर दिनांक 1 डिसेंबर 2016 पासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली. आपुलकी सभासद योजना अंतर्गत मृत सभासदांच्या  वारसास  रुपये 1,00,000/- इतकी आर्थिक मदत दिली जाते.

दिनांक 31 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यंत दिवंगत झालेले व आपुलकी सभासद निधी योजनेस पात्र असलेले.

एकूण मृत सभासद संख्या  : 270

सर्व पात्र सभासदांना लाभान्वित झालेली एकूण रक्कम

  • एकूण रुपये : रु.2 कोटी 70 लाख

या योजनेमधून रुपये एक लाखाची आर्थिक मदत मिळाल्याने घरातील कर्ता माणूस अकस्मात गमावल्यामुळे जी आर्थिक अडचण निर्माण होत असते त्या अडचणीतून सदर कुटुंबीयांना विद्यमान कार्यकारिणीने दिलासा मिळवून दिला.

आपुलकी सभासद योजनेचा प्रमुख उद्देश

  • संस्थेच्या सभासदां बद्दलची सामाजिक बांधिलकी लक्षात घेता सभासदांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत मिळवून देणे

योजनेचा पायाभूत निधी संकलन

  • प्रत्येक सभासदांकडून अनिवार्य मासिक वर्गणी रुपये वीस फक्त दरमहा वेतन कपात करून घेतली जाते

योजनेचे वैशिष्ट्य

BARC / DAE आणि संलग्न असलेल्या युनिटमधील मा सभासदांचा कोणत्याही कारणास्तव अकाली मृत्यू झाल्यास सभासदांच्या वारसास रुपये 1,00,000/- तातडीची आर्थिक मदत मिळवून देणे.

योजनेत सहभागी झाल्यानंतर पगारातून पहिलाच हप्ता संस्थेकडे वर्ग झाल्यास व दुर्दवाने सभासदाचा कोणत्याही कारणास्तव मृत्यू झाला तरी अशा सभासदास या योजनेअंतर्गत लाभ मिळवून देणे.

नैसर्गिक व अनैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात आल्यास ज्या प्रमाणात निधी उपलब्ध असेल त्या समप्रमाणात सदर निधीचे वाटप करण्यात येईल.