TATKAL BANKING

सभासदांच्या सेवेत पायाभूत सुविधा

जलद सेवा

सभासदांची आर्थिक गरज लक्षात घेता संस्थेचे सर्व व्यवहार जलद गतीने होतात. त्यानुसार सभासदांसाठी आवश्यक व महत्वाचा व्यवहार म्हणजे मंजूर कर्ज प्रकरणे बँक खात्यावर वर्ग करणे, परिपक्व झालेले (गुंतवणुकीय) देय बँक खात्यावर वर्ग करणे. सभासद सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांचे सभासदत्व संपुष्टात आल्यावर त्यांचे अंतिम देय बँक खात्यावर वर्ग करणे व इतर महत्वाचे आर्थिक व्यवहार ताबडतोब होणे सर्व सभासदांना अपेक्षित असते. या गोष्टींना मूलभूत मानून पारंपरिक व्यवहार करीत असताना काही तांत्रिक बँकिंग समस्यांमुळे सभासदांच्या बँक खात्यावर वरील व्यवहार वर्ग होण्यास होणारा विलंब लक्षात घेता सर्व व्यवहाराचे देय बँक खात्यात जमा होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत पायभूत सुविधांचा विकास करीत तात्काळ बँकिंग प्रणालीमध्ये (आय. एम. पी. एस./एन. ई. एफ. टी./आर. टी. जी. एस.) सभासदांचे सर्व व्यवहार जलद गतीने पूर्ण केले जातात.

याच माध्यमातून भविष्यात खालील सेवा स्थापित करणे सुलभ होणार आहे.