E-SERVICES
1. ONLINE SERVICE
सकारात्मक वापर
लोकाभिमुख सामाजिक मंच
उपयुक्त आणि आवश्यक आर्थिक व्यवहारांची माहिती प्रसिद्ध सामाजिक मंचावरून सभासदांच्या सेवेत दिवस-रात्र 24 तास प्रदान.
सभासदांचा संस्थेसोबत असलेला आर्थिक व्यवहार विश्वसनीय असावा यासाठी सभासदांचे सर्व व्यवहार संगणकीय प्रणालीद्वारे जतन केले जातात व वेळोवेळी सभासदांच्या आवश्यकतेनुसासर त्यांना प्राप्त व्हावेत या उद्देशाने सामाजिक मंचाच्या तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करीत सभासदांच्या खात्यावरील आवश्यक सर्व माहिती दिवस रात्र 24 तासामध्ये कधीही उपलब्ध व्हावी यासाठी https://52142.k3one.in/EBankingNew_TrombeESC/ वरुन सभासदांसाठी ही सेवा उपलब्ध करून सभासद आणि संस्था आणि व्यवहार यामध्ये विश्वसनीय नात्याची जपणूक केली आहे.
2. CMP BANKING
जलद सेवा
सभासदांची आर्थिक गरज लक्षात घेता संस्थेचे सर्व व्यवहार जलद गतीने होतात. त्यानुसार सभासदांसाठी आवश्यक व महत्वाचा व्यवहार म्हणजे मंजूर कर्ज प्रकरणे बँक खात्यावर वर्ग करणे, परिपक्व झालेले (गुंतवणुकीय) देय बँक खात्यावर वर्ग करणे. सभासद सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांचे सभासदत्व संपुष्टात आल्यावर त्यांचे अंतिम देय बँक खात्यावर वर्ग करणे व इतर महत्वाचे आर्थिक व्यवहार ताबडतोब होणे सर्व सभासदांना अपेक्षित असते. या गोष्टींना मूलभूत मानून पारंपरिक व्यवहार करीत असताना काही तांत्रिक बँकिंग समस्यांमुळे सभासदांच्या बँक खात्यावर वरील व्यवहार वर्ग होण्यास होणारा विलंब लक्षात घेता सर्व व्यवहाराचे देय बँक खात्यात जमा होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत पायभूत सुविधांचा विकास करीत तात्काळ बँकिंग प्रणालीमध्ये (आय. एम. पी. एस./एन. ई. एफ. टी./आर. टी. जी. एस.) सभासदांचे सर्व व्यवहार जलद गतीने पूर्ण केले जातात.
याच माध्यमातून भविष्यात खालील सेवा स्थापित करणे सुलभ होणार आहे.