- माहिती तंत्रज्ञानावर आधारीत बँकिंग क्षेत्रामध्ये कोअर बँकिंग संगणक प्रणालीचे महत्व असून ही एक प्रसिद्ध आणि बँकिंग व्यवहाराशी निगडीत प्रणाली म्हणून परिभाषित केली जाते, जी बँकेच्या किंवा पतसंस्थेच्या विविध शाखांमध्ये बँकिंग व्यवहारावर प्रक्रिया करते.
- सदर प्रणालीमध्ये प्रामुख्याने ठेवींचे व्यवहार, कर्जाचे व्यवहार आणि संबंधित पतसंस्थेच्या प्रक्रियांचा समावेश आहे.
- या द्वारे विद्यमान आणि संभाव्य सभासदांच्या खात्यातील आर्थिक व्यवहार करण्यासाठी सुलभता निर्माण व्हावी यास प्राधान्य दिलेले आहे.
- तांत्रिकीकरणामुळे याद्वारे व्यवहार अधिक सुरक्षित, परिणामकारक, वेगवान आणि सुलभ होतात.
- भारतातील कोणत्याही भागातून हे व्यवहार दूरस्थपणे नियंत्रित केले जाऊ शकतात.
- वस्तुस्थितीला धरून सध्या कोअर बँकिंग प्रणाली ही पतसंस्थेची महत्वाची आणि मूलभूत बाब बनली आहे.
- या प्रणालीमुळे ऑपरेशनल खर्च कमी होतो.
- सभासदाची व्यावहारीक जबाबदारी सक्षम होते.
- सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन आधारित प्लॅटफॉर्म असल्यामुळे ही बँकिंग प्रणाली वापरकर्त्यासाठी अनुकूल आणि अधिक कार्यक्षम बनवते.
- कोअर बँकिंग प्रणालीचे फायदे बहुआयामी आहेत.
- वेगाने विकसित होत असलेल्या आर्थिक क्षेत्रातील स्पर्धात्मक वस्तुस्थितीचा समतोल राखणे शक्य होते.
- या आधारे मोबाइल बँकिंग, एटीएम, किऑक्स, मोबाइल अॅप अशा इतर सेवा सुविधा निरमा केल्या जाऊ शकतात.