कर्ज संरक्षण निधी योजना

57व्या वार्षिक सर्वसाधारण सभेने बहुमताने प्रस्ताव पारीत केल्याप्रमाणे विशेष कर्ज घेतलेले सर्व सभासद या कर्ज संरक्षण निधी योजनेचे सभासद असून रु.12 लाखापर्यंतच्या विशेष कर्जाच्या प्रत्येक महिन्याच्या उर्वरीत कर्जावर  (outstanding loanवर) 0.5% (रु.41.67 प्रती माह प्रती लाख) वर्गणी  कपात करण्यात येऊन सदर वर्गणी कर्ज संरक्षण निधी योजने अंतर्गत वर्ग करण्यात येते.

सभासदाचे दुर्देवी निधन झाल्यास कर्ज संरक्षण निधी अंतर्गत (खालील अटी व शर्तीस निधन झालेला सभासद अपात्र नसल्यास) सभासदाचे निधन झालेल्या तारखेस रु.12 लाखापर्यंतच्या विशेष कर्जाची असलेली शिल्लक कर्ज रक्कम कर्ज संरक्षण निधीतून पात्र मयत सभासदाच्या वर्ग करण्यात येऊन व अशा पात्र मयत सभासदाचे रु.12 लाखापर्यंतच्या विशेष कर्जाची शिल्लक रक्कम निरस्त केली जाते.

कर्ज संरक्षण निधी योजना

कर्जदाराचा त्याचे सेवा कालावधीमध्ये अंत झाल्यास कर्ज रक्कम परतफेड होण्यास विलंब लागतो किंवा जामिनदारावर नाहक बोजा पडतो. तसेच अशा सभासदाच्या वारसावर आर्थिक बोजा पडतो. यामधून होणा-या नाहक त्रासाचा त्रास टाळण्यासाठी कर्ज संरक्षण निधी अंतर्गत सेवाकालावधीमध्ये निधन झालेल्या सभासदांच्या 12 लाखापर्यंतच्या विशेष कर्जास संस्थेच्या पातळीवर ‘कर्ज संरक्षण निधी’ अंतर्गत संरक्षण दिले जाते. यामुळे निश्चितच मयत सभासदाच्या वारसास व जामिनदारांस दिलासा मिळाला आहे. सदर कर्ज संरक्षण निधी योजनेची अंमलबजावणी  दि. 01.10.2018 पासून करण्यात आली.

31.05.2021 पर्यंत या योजनेस

एकूण पात्र दिवंगत सभासद  : 81

मृत सभासदांची निरस्त झालेली एकूण रक्कम

रुपये : 3,93,70,216/-

मृत सभासदांची निरस्त झालेली एकूण रक्कम

रुपये : 3,93,70,216/-

योजनेअंतर्गत लाभान्वित झालेले व दिलासा मिळालेले एकूण जामीनदार : 243